स्वामी समर्थ सेंद्रिय बचत गटाच्या माध्यमातून गावातील तरुणांनी शेती उद्योगात केली प्रगती.

news_image

काजीसांगवी गावातील तरुणांनी एकत्र येऊन उद्योजकतेचा नवा मार्ग स्वीकारला असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर तयार केलेला शेत माल विदेशात विक्री साठी पाठवून नवी प्रगती केली आहे. सदर बचत गटापासून गावातील 27 शेतकरी लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेला असून गावातील 100 ते 200 तरुणांना अप्रत्यक्ष गावातील तरुणांना रोजगार मिळू लागला आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादनाची गुणवत्ता वाढवली गेली आहे आणि देशात आणि विदेशी बाजारपेठेत या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली आहे. शेतकरी महिलांनीही ह्या गटांच्या माध्यमातून सहभाग घेतल्याने आर्थिक स्वावलंबनाचे नवे उदाहरण घडले आहे.

या उपक्रमामुळे गावातील बेरोजगारी कमी होऊन विकासाची गती वाढली आहे. गावकऱ्यांचा आत्मविश्वास आणि एकतेच्या जोरावर उभा राहिलेला हा उद्योग संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म